धान्य भक्षक कीटकामुळे उत्तर प्रदेशत १० जिल्ह्यांमध्ये अलर्ट

13

उत्तर प्रदेश, दि. २७ मे २०२०: उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील १० जिल्हे आणि राजस्थान तसेच मध्यप्रदेश मधील काही भागांना चेतावणीचा आदेश दिला आहे. हा आदेश धान्य भक्षक कीटक (नाकतोडा) संदर्भात आहे. एका सरकारी प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेलगत असलेल्या उत्तर प्रदेश मधील १० जिल्ह्यांमध्ये धान्य भक्षक कीटकांच्या टोळ्यांच्या आक्रमणाची पुष्टी झाली आहे.

राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील सारमथुरामार्गे मध्य प्रदेशातील टोळांच्या पथकाने मध्य प्रदेशातील मोरेनाकडे प्रस्थान केले आहे. सध्याच्या वाऱ्याच्या दिशेने मध्य प्रदेशातील कैलारस गाठण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या झाशी, ललितपूर, जालौन आणि औरैया यांना या धान्य भक्षक कीटकांच्या आक्रमणाविषयी सतर्क केले आहे. यासह हमीरपूर, कन्नौज, इटावा आणि कानपूर ग्रामीण भाग व जवळील काही इतर जिल्ह्यांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांना धान्य भक्षक टोळकांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना नष्ट करणे किंवा त्यांना पळवून लावणे यासाठीच्या उपाययोजना देखील करण्यास सांगितले आहेत. यासह, स्थानिक तापमानवाढ संस्थेचे तांत्रिक पथक आणि प्रादेशिक रहिवासी आणि शेतकरी यांच्याशी सतत समन्वय राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, या कीटकांना पळवण्यासाठी गोंगाट करणे, प्लेट्स व भांडी वाजवणे आणि फटाके उडवण्यास सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी