पती-पत्नीच्या नात्यातील ‘तिसऱ्या’ला आता भरपाई द्यावी लागणार? उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करून नाते बिघडवणाऱ्या ‘तिसऱ्या व्यक्तीला’ आता नुकसानभरपाई द्यावी लागण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ (वैवाहिक प्रेमपूर्ण नात्यात तृतीय पक्षाने हस्तक्षेप केल्यामुळे नाते बिघडणे) या आधारावर दाखल केलेला नागरी दावा ग्राह्य धरला आहे या निर्णयामुळे विवाहबाह्य संबंध असलेल्या जोडप्यांसह त्यांच्या प्रियकर/प्रेयसीचे धाबे दणाणले आहेत.

‘एलिएनेशन ऑफ अफेक्शन’ म्हणजे जाणूनबुजून वैवाहिक नाते तोडण्यास कारणीभूत ठरणे, जे आता जाणीवपूर्वक केलेले चुकीचे कृत्य (Intentional Tort) मानले जाऊ शकते. सध्या एका प्रकरणात पत्नीने पतीच्या कथित प्रेयसीविरुद्ध ५ कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. घटस्फोटाव्यतिरिक्त आता नुकसानभरपाई मिळवण्याचा एक नवा मार्ग न्यायव्यवस्थेत उघडला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले