माथाडी कायद्यात बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ५० हजार माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या मागील अधिवेशनात हा बदल मंजूर झाला असून, हिवाळी अधिवेशनात अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे व्यापारी आस्थापनांच्या मागणीनुसार, ‘इतर श्रमजीवी कामगार’ हा घटक आणि यंत्राच्या साह्याने काम करणारे कामगार कायद्यातून वगळले जात आहेत.
यामुळे १९६९ मध्ये कष्टकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार झालेल्या या कायद्याचा लाभ लाखो गरीब कामगारांना मिळणार नाही. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी या बदलांना तीव्र विरोध दर्शवला असून, “कायद्याला नख लावाल तर जेल भरो आंदोलन करू,” असा थेट इशारा सरकारला दिला आहे. कामगार संघटना या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले











































.jpeg?updatedAt=1707974194875)
