नवी दिल्ली, दि. २४ जून २०२० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, अवकाश विज्ञान आणि बँकांमध्ये मोठ्या सुधारणांच्या अध्यादेशाला आज मान्यता देण्यात आली आहे. आता सरकारी बँका (शहरी सहकारी बँका असो वा बहु-राज्य सहकारी बँका) रिझर्व्ह बँकेच्या सुपर व्हिजन पॉवरखाली येतील.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, शहरी सहकारी बँकांसह सार्वजनिक क्षेत्रातील १४८२ बँक आणि ५८ बहु-राज्य सहकारी बँकांना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या सुपर व्हिजन अंतर्गत आणले जात आहे. आरबीआय चे नियम व नियंत्रण ज्याप्रमाणे अनुसूचित बँकांवर आहे त्याचप्रमाणे आता आरबीआय चे नियम व नियंत्रण सहकारी बँकांवर लागू असतील.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, आरबीआयच्या देखरेखीखाली १,५४० सहकारी बँका आणण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या खातेदारांना फायदा होईल. या निर्णयामुळे या बँकांमधील ८.६ कोटीहून अधिक ठेवीदारांना बँकांमधील ४.८४ लाख कोटी ठेवी सुरक्षित राहण्याचे आश्वासन मिळेल
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी सुधारणा झाली आहे. आत्तापर्यंत आपण खगोलशास्त्रामध्ये व आंतराळ शास्त्रामध्ये मोठा विकास केला आहे आणि या विकासाचा सर्वांनाच फायदा होणार आहे. याच बरोबर कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केले जात आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, इतर मागासवर्गीयांच्या वर्गवारीत उप-वर्गीकरणाच्या मुद्दयांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाच्या मुदतीच्या मुदतवाढीस ६ जानेवारीपर्यंत म्हणजे ३१ जानेवारी २०२१ पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी