ऑटो एक्सपोमध्ये Maruti Suzuki EVX चे अनावरण! पूर्ण चार्जवर ५०० किलोमीटर मिळणार ड्रायव्हिंग रेंज

पुणे, ११ जानेवारी २०२३: वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो २०२३ सुरू होताच आपली नवीन इलेक्ट्रिक SUV संकल्पना Maruti Suzuki EVX सादर केली आहे. ही कार कंपनीने इलेक्ट्रिक SUV प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. जी ग्राहकांना एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ५०० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. यावर्षी मारुती सुझुकी ग्रीन मोबिलिटी आणि इनोव्हेशन या थीम अंतर्गत ऑटो एक्सपो २०२३ मध्ये आपल्या नवीन कारचे प्रदर्शन करणार आहे .

या इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्ट कारची लांबी ४, ३०० मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,६०० मिमी आहे. कंपनीने या कारमध्ये ६०kWh बॅटरी दिली आहे, ज्याला कंपनीने सेफ बॅटरी टेक्नॉलॉजी असे नाव दिले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार ग्राहकांना पूर्ण चार्ज केल्यावर ५०० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापण्यास मदत करेल. याशिवाय मारुती सुझुकीने वॅगनआर फ्लेक्स इंधन, ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड आणि ब्रेझा एस-सीएनजी यासारख्या इतर वाहनांची श्रेणी देखील प्रदर्शित केली आहे. वॅगनआर फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइपमध्ये येत आहे, फ्लेक्स इंधन पर्यायाने भरलेली कार E85 इंधनावर चालेल.

Brezza S-CNG मॉडेल प्रदर्शित

मारुती सुझुकीने त्याच्या आगामी मारुती ब्रेझाचे एस सीएनजी मॉडेल ऑटो एक्सपो २०२३ मध्ये प्रदर्शित केले आहे. मारुती सुझुकीकडे १४ फॅक्टरी फिट सीएनजी वाहनांची सर्वात मोठी श्रेणी आहे.

ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड !

कंपनी आता इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड सिस्टम आणि ई-सीव्हीटी ट्रान्समिशनसह ग्रँड विटारा आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये २७.३७ किमी मायलेज देईल.

मारुती सुझुकीचा दावा आहे की नवीन एसयूव्ही केवळ कामगिरीच नाही तर प्रगत कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये देखील देईल. कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही उत्पादनासाठी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा