दिल्लीत आज अखिल भारतीय शिक्षण परिषद, PM मोदी करणार उद्घाटन

नवी दिल्ली, २९ जुलै २०२३ : प्रगती मैदानावर आजपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शिक्षा परिषद सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भारत मंडपम, प्रगती मैदान येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) स्थापन झाल्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त केले जात आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदी PM SHRI योजनेअंतर्गत निधीचा पहिला हप्ता जारी करतील.

परिषदेच्या उद्घाटनावेळी मोदी हे शिक्षण आणि कौशल्य अभ्यासक्रमावरील १२ भारतीय भाषांमध्ये अनुवादित पुस्तकांचे प्रकाशनही करतील. २९ आणि ३० जुलै रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात शिक्षण तज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योग प्रतिनिधी तसेच शिक्षक, शाळा, उच्च शिक्षण, कौशल्य संस्थांमधील विद्यार्थी आणि त्यांचे व्हिजन इतरांशी शेअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

परिषदेत सोळा सत्रांचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये दर्जेदार शिक्षण आणि प्रशासन, समान आणि समावेशक शिक्षण, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित गटांचे प्रश्न, राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क, भारतीय ज्ञान प्रणाली आणि शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण या विषयांवर चर्चा केली जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा