न्यूयॉर्क, २४ जानेवारी २०२१: २०२१ मध्ये आलेल्या न्युक्लिअर बॅन ट्रीटी ला भारताने नाकारले आहे. जगातील ही पहिली अशी ट्रीटी आहे जिला युएन ने पास केली आहे. या ट्रीटी नुसार ज्या देशांकडे न्युक्लिअर वेपण असतील त्या सर्व देशांनी आपली सर्व न्युक्लिअर वेपण नष्ट करावीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या ट्रीटी मध्ये असा कोणताही पर्याय दिला गेलेला नाही की, अशी शस्त्रे बनविण्यावर बंदी राहील किंवा गतिविधि वर बाबंदी लावण्यात येईल, तर संपूर्ण न्युक्लिअर वेपण नष्ट करण्याचा आदेश आहे. इस्राईल, अमेरिका, रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, फ्रान्स या देशांकडे सध्या न्युक्लिअर वेपण आहेत. या ट्रीटी नुसार या सर्व देशांनी आपली सर्व न्युक्लिअर वेपण नष्ट करावीत असे यात सांगण्यात आले आहे.
या नवीन ट्रीटी नुसार यु एन ‘न्युक्लिअर वेपण फ्री वर्ड’ ची धारणा प्रोत्साहित करत आहे. जगाला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी ही नवीन ट्रीटी सर्वांनी अमलात आणावी असे यु एन कडून सांगण्यात येत आहे. यु एन चे सेकेट्री जनरल एंथोनिया गोथरिस यांनी देखील या बाबत वक्तव्य करत जगाच्या शांततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचा उल्लेख केला आहे.
मात्र, ही नवीन ट्रीटी सर्व न्युक्लिअर पॉवर देशांनी नाकारली आहे. ज्यात इस्राईल, अमेरिका, रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, फ्रान्स या देशांचा समावेश आहे. यामागचे कारणही तसे आहे. कारण नॉर्थ कोरिया आणि चीन या देशांवर कोणीही विश्वास ठेऊ शकणार नाही. तर काही देश असे आहेत ज्यांची संरक्षण प्रणाली न्युक्लिअर शस्त्रांवर अवलंबून आहे जसे की पाकिस्तान. जरी भारताने ही ट्रीटी अवलंबली तरी शेजारील हे दोन देश याचे किती पालन करेल याची विश्वासहर्ता नाही. त्यामुळं कोणताही देश या नवीन ट्रीटीला अवलंबण्यास तयार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे