‘ऑल इंडिया सिने-वर्कर्स असोसिएशनचे’ पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, ‘आदिपुरुष’ चे स्क्रीनिंग त्वरित बंद करा

दिल्ली २० जून २०२३: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या बॉलिवूड सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेले वाद वाढताना दिसतायत. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केलीय. प्रभास, क्रिती सेनन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं देखील दिसून येतय.

प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.चित्रपटातील हनुमानाच्या संवादांवरही प्रेक्षवर्गानी आक्षेप घेतल्यानंतर निर्माते आणि लेखक यांनी विरोध पाहता, त्यातील काही वादग्रस्त संवाद बदलायचे ठरवले आहे. सगळीकडूनच या चित्रपटावर बंदी घालायची मागणी होत असतानाच ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि भविष्यात चित्रपटगृहे आणि OTT प्लॅटफॉर्मवर ‘आदिपुरुष’ स्क्रीनिंगवर त्वरित बंदी घालण्याची विनंती केलीय.

चित्रपटातील दृश्य आणि संवादावरुन अनेकांनी चित्रपटावर टीका केली आहे. चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत नेपाळने आक्षेप व्यक्त केला आहे. परिणामी नेपाळने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. इतकंच नव्हे तर त्यांनी कोणतेही भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा