सोलापूरातील सर्व ग्रंथालय, अभ्यासिका सुरू करण्यात याव्यात – अभाविप, सोलापूर

सोलापूर, २४ ऑक्टोबर २०२०: विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर यांचेकडून अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्यासाठी हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंद होता. सध्या राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी “पुनच्छ हरिओम” चा नारा दिला; परंतु, या नाऱ्यामध्ये ज्ञानार्जनाची पवित्र ठिकाणे बंद आहेत. मात्र, यामध्ये प्रथम प्राधान्य देत दारूची दुकाने खुली केली आणि तद्नंतर इतर गोष्टी खुल्या केल्या. “ज्ञानालये बंद” पण “मद्यालये सुरु”, अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे. यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. राज्यातील ग्रंथालये, अभ्यासिका तात्काळ सुरु करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत आहे. सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षे बरोबर इतर अनेक परीक्षा (UPSC, MPSC) सुरु आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ग्रंथालये आणि अभ्यासिकांची गरज आहे. परंतु, सरकार याबाबत उदासीनता बाळगून आहे. हॉटेल, बार, सुरु करण्यासठी सरकार आग्रही आहे; पण, अभ्यासिके आणि ग्रंथालये सरकार सुरु का करत नाही?

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने तत्काळ अभ्यासिके आणि ग्रंथालये सुरु करावेत, अश्या मागणी सह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडून हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले. याचसोबत, जिल्हाअधिकारी यांना यासंबंधीत निवेदन देखील देण्यात आले.

यावेळी महानगर सहमंत्री अनिकेत प्रधाने, जिल्हा सहसंयोजक रेवती मुदलियार, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सृष्टी डांगरे, उर्वी पटेल, मयूर जव्हेरी, सुरज पावसे, आदित्य मुस्के, समर्थ दरेकर, दरेश जालदी, मकरंद कामूर्ती व इतर विद्यार्थी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा