१००, १०, ५ च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार

नवी दिल्ली, २३ जानेवारी २०२१: नोट बंदिनंतर बाजारात नवीन १००, १० च्या नोटा आल्या होत्या. मात्र जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने मागे घेतल्या नव्हत्या. आता ही प्रक्रिया सुरू झाली असून १००, १०, ५ च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे.
वास्तविक, १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच याच्या नवीन नोटा यापूर्वीच चलनात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१९ मध्ये १०० रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत चलनातील जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील.
दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळा अफवा पसरविल्या जात आहे. रिझर्व्ह बँकेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, असे काहीही नसले तरी देखील अनेक लोक चलनामध्ये १० रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा