रामबनमध्ये १० वीपर्यंतच्या सर्व शाळा बंद, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत

जम्मू काश्मीर २६ जून २०२३: जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा इशारा लक्षात घेता, रामबन जिल्ह्यातील सर्व माध्यमिक स्तर (इयत्ता १०) शाळा, आज म्हणजेच २६ जून रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील मेहद परिसरातही दरड कोसळण्याच्या घटना पहायला मिळत आहेत. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

रामबनच्या उपायुक्तांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे आज सर्व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचवेळी, पाऊस आणि भूस्खलनामुळे रामबनच्या मेहद भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. पावसासाठीही सर्व परिस्थिती अनुकूल असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या सल्ल्यानुसार, पावसामुळे काही ठिकाणी, विशेषत: जम्मू भागात अचानक पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडू शकतात.

२६ ते २७ तारखेदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्याचबरोबर २८ आणि २९ जून रोजी काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर स्थानिक प्रशासनानेही लोकांना भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा