राज्यातील सगळे व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून सुरू होणार

मुंबई, दि.१५ जून २०२०: गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पर्यटन केंद्र बंद करण्यात आले आहेत. मात्र आता व्याघ्रप्रेमींना राज्य सरकारकडून चांगली बातमी देण्यात आली आहे. राज्यातील व्याघ्रप्रकल्प लवकरच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यातील सगळे व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी १ जुलैपासून सुरू होणार, वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.
राज्यातील सगळे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान,तब्बल तीन महिन्यानंतर राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह सगळे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य पर्यटकांसाठी सुरू होणार असल्याचे राज्य सरकारकडूनच सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा