सर्व महिलांना ठरावीक वेळेत क्यू आर कोडशिवाय प्रवासाची मुभा

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२० : मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधे महिलांना ठरावीक वेळेत क्यू आर कोडशिवाय प्रवासाची मुभा देण्याची राज्य सरकारची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मान्य केली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसंच रात्री सातनंतर शेवटच्या लोकलपर्यंत वैध तिकिटावर प्रवास करण्याची मुभा देण्यात येत असल्याची घोषणा गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज केली.

गेल्या शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी क्यू.आर. कोडशिवाय महिलांना ठराविक वेळेत प्रवास करु देण्याची विनंती करणारं पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठवलं होतं.

इतर वेळेतल्या प्रवासासाठी मात्र नेहमीप्रमाणे नियम लागू असतील. याशिवाय, अत्यावश्यक सेवेसह ज्या ज्या घटकांना प्रवासाची मुभा आहे. त्यांना ओळखपत्र आणि क्यू आर कोडचं बंधन कायम असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा