मुलीला पळवल्याचा आरोप करत वृद्धेला विवस्त्र करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ बनवला

औरंगाबाद, ५ डिसेंबर २०२२ औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नातवाने मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करत आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओझर मधील आहे.
वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी आरोपीने महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण केली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही.

  • आरोपी विरोधात गुन्हा दाखल

माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेल्याने वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा