ऑनलाइन घरपोच दारू विक्रीला परवानगी; २२०० नागरिकांनी केले बुकिंग

औरंगाबाद, दि.३जून २०२० : औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाने ऑनलाईन घरपोच मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी २२०० ग्राहकांनी घरपोच दारूसाठी बुकिंग केली.त्यामुळे एकाच दिवसात सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज मद्य व्यावसायिकांनी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरात सोमवारपासून घरपोच दारूविक्रीला सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे दुकानदारांनी रात्रीपासूनच दुकानाबाहेर घरपोच विक्रीसाठी फोन नंबरचे फलक लावून ठेवले होते. तरीही सकाळी अनेक भागांत दारू दुकान उघडण्याच्या आधीपासूनच मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. नंतर पोलिसांनी येऊन गर्दी पांगवली. काही ठिकाणी विक्रेत्यांनी दुकानातून लपूनछपून विक्री केल्याचेही समोर आले. परवाना असेल तरच घरपोच दारू मिळेल, असा नियम असल्यामुळे सोमवारी परवाना मिळवण्यासाठी शेकडो मद्यप्रेमींनी उत्पादन शुल्क विभागाकडे ऑनलाईन अर्ज केले. वाईन शॉप चालकांनी एक दिवसासाठीचा परवाना देऊन मद्यविक्री केली.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डिसुझा वाइन शॉप व गजानन वाइन शॉपीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कदम यांनी दिली. जादा दराने विक्री करणाऱ्यांवर व फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा