अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या महिलेस अटक

बारामती, ११ ऑगस्ट २०२०:  बारामती तालुक्यातील पणदरे गावातील पवईमाळ येथे अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना आरोपीने तिचे अश्लील व्हिडीओ व फोटो काढून ते अज्ञात व्यक्तींना पाठवले असल्याने ३३ वर्षीय महिला आरोपीच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विलास रमेश जगताप यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाची हकीकत पुढील प्रमाणे: पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या घरी अंघोळ करत असताना आरोपीने १/९/२०१९ ते २८/४/२०२० या कालावधीत तिचे फोटो व अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढून ते अज्ञात व्यक्तींच्या मोबाईलवर पाठवले आहेत. याबाबत आरोपी महिलेने गुन्हा कबुल केला असुन या प्रकरणी बालकाच्या लैंगिक संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी महिलेने मुलीचे व्हिडीओ कोणत्या व्यक्तींना पाठवले आहेत, या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहे का, हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून झाला आहे का, जप्त केलेल्या मोबाईल व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या मोबाईलने व्हिडीओ काढले आहेत का, आरोपीने आणखी दुसऱ्या मुलींचे असे फोटो काढले आहेत का, याबाबत तपास सुरु आहे.

या आरोपी महिलेला जामीन देऊ नये व पुढील तपासासाठी पोलिसांनी पोलीस कास्टडीची व पाच दिवसाच्या रिमांडची विनंती न्यायालयाकडे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा