लॉकडाउन कमी करण्यात आले असले, तरी कोरोना कमी झालेला नाही….

उस्मानाबाद, दि. ८ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्ह्यातील लॉकडाउन हे ३१ ऑगस्ट पर्यंत लागू केलेले आहे. काही नियमानुसार या कालावधीत कामे चालू आहेत. तरी या महामारीच्या वेळेत नागरिकांनी प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन तर करावेच, आणि स्वतः देखील सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

लॉकडाउन जरी कमी करण्यात आला असेल, तरी कोरोना काही कमी झालेला नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याप्रमाणे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. नागरिकांचे आरोग्य हेच आपल्याला सर्वाधिक महत्त्वाचे असून आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधांची निर्मिती करून हा आजार टाळण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. तरी, यासाठी नागरिकांचे केवळ सहकार्य अपेक्षित आहे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद मधील कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या येडशी, ढोकी, उपळा, शिंगोली, सारोळा(बु), वाघोली, पाडोळी, बेंबली, देवळाली, गडदेवदरी, घाटंग्री, जुणोनी, रूई ढोकी, सकनेवाडी, वरवंटी, व खामसवाडी आदी गावांमध्ये नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप देखील त्यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा