गोल पोस्ट राष्ट्रीय मी अर्धवटराव तर फडणवीस दिल्लीकरांची आवडाबाई आहेत का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मी अर्धवटराव तर फडणवीस दिल्लीकरांची आवडाबाई आहेत का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई २० जून २०२३: कोरोनाची लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केली, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. त्यावर अर्धवटरावांनी मी काय म्हणालो ते पूर्ण ऐकलेच नाही, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. शिवाय फडणवीस यांनी त्यांच्या त्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ देखील ट्वीट केला होता. आता फडणवीसांच्या या टिकेनंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा पलटवार केला आहे. ‘मला अर्धवटराव म्हणत असतील तर ते काय दिल्लीकरांची आवडाबाई आहेत का? असा टोला ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

मुंबई येथे आज माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मोदींनी लस तयार केली, या वक्तव्याला काय अर्थ आहे का? मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे काय दिल्लीकरांची आवडाबाई आहे का? त्या चित्रपटात दोन पात्र होती अर्धवटराव आणि आवडाबाई पण ते आता नावडाबाई झाले आहेत, असा पण टोला ठाकरेंनी लगावला.

युती सरकारच्या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी, १ जुलैला शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरें या मोर्चाच नेतृत्व करतील. कोणत्याही कामासाठी महापलिकेचा पैसा बेधडक वापरला जातोय, हा जनतेचा पैसा आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version