Amazon ला CCI कडून दुहेरी झटका, फ्युचर कूपन डील निलंबित, 200 कोटींचा दंडही

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2021: भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी Amazon ला दुहेरी झटका दिला आहे. आयोगाने शुक्रवारी Amazon आणि Future Coupons मधील 2019 च्या कराराला स्थगिती दिली. यासोबतच कराराची परवानगी मिळवण्यासाठी महत्त्वाची माहिती लपवल्याबद्दल अॅमेझॉनला २०० कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

रिलायन्स-फ्युचर डीलशी संबंधित प्रकरण

अॅमेझॉन आणि फ्युचर ग्रुपमधील हा कायदेशीर वाद प्रत्यक्षात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमधील 24,713 कोटी रुपयांच्या डीलशी संबंधित आहे. रिलायन्स-फ्युचर डील अंतर्गत, रिलायन्स ग्रुपला फ्युचर ग्रुपच्या रिटेल आणि लॉजिस्टिक कंपन्यांमधील संपूर्ण स्टेक मिळणार आहे. परंतु या करारावरून फ्युचर ग्रुपची यूएस ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनसोबत एका वर्षाहून अधिक काळ वाद सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा