अंबरनाथमध्ये मशिदीबाहेर सोशल डिस्टनसिंगचे वाजले तीनतेरा

अंबरनाथ, ३१ ऑगस्ट २०२०: अंबरनाथमध्ये आज मुस्लिमांचा किमान जमाव जमला होता. अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली मशिदीबाहेर जमाव जमला होता. मोहरमला कोणत्या गुरूंनी प्रवचन करावं, यावरून अंबरनाथमध्ये मुस्लिम समाजाच्या दोन गटात वाद झाले. यावेळी येथे उपस्थित असलेल्या मुस्लिम जमावात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे, त्याच बरोबर अनेकांनी मास्कचा वापर देखील केला नव्हता.

शासनाने जरी मोहरमला सार्वजनिकरित्या परवानगी दिली नसली तरी देखील मोहरमला कोणत्या गुरूंनी प्रवचन करावं या कारणांवरून हे दोन गट हट्टाला पेटले होते. त्यांच्या शाब्दिक वादविवादाला कालांतराने धक्काबुक्कीचे स्वरूप प्राप्त झाले. यात अनेकांनी तर साधा मास्क किंवा रूमाल सूद्धा तोंडाला बांधला नव्हता, त्यामुळे कोरोनाला स्वतःहून आमंत्रण दिले गेले. पण या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी मात्र एनसी सुद्धा दाखल केलेली नाही.

एकीकडे राज्यात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलनं सुरू आहेत, तर आज प्रकाश आंबेडकरांनी पंढरपूरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.  दूसरीकडे मशिदीत अशाप्रकारे मोहरमला कोणत्या गुरूंनी प्रवचन करावं, यावरून वाद सूरू झाला आहे. आणि यात कोरोनाच्या परिस्थितीवर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता राज्यात धार्मिक वाद सुरू होण्यास सूरूवात झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा