रिपब्लिकन अस्तित्वासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा लोकसभा लढवणार- नारायण बागडे

14

नागपूर १ मार्च २०२४ : रिपब्लिकन मतदानाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा राज्यातील काही मतदार संघात लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे रिपब्लीकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून रिपब्लिकन मतदानाचे अस्तित्व कायम झाले, तेव्हाच्या प्रस्थापित काँग्रेस पक्षाला लढा देत रिपब्लिकन पक्षाने आपली धाक कित्येक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिली. एवढेच नव्हे तर आज सत्तेत असलेल्या भाजला व तेव्हाच्या जनसंघाला सुद्धा रिपब्लिकन पक्षांची ताकद पाहून स्वतः समर्थन देण्याशिवाय पर्याय राहत नव्हता.

आज रिपब्लिकन पक्षाची दाना दान पाहून यांच्या त्यांच्या घरट्यात राहून रिपब्लिकन अस्तित्व धोक्यात टाकले.निवडणुकीत परिणाम काही पण येत होता. त्यांची समाज पर्वा करित नव्हता. लढण्याची जिद्द समाजाला ऊर्जा प्रदान करत होती. या माध्यमातून रिपब्लिकन अस्तित्व आणि दरारा निर्माण होत होता. भाजप, काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाने रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही आंबेडकरी चळवळीतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची माळ घातली नाही. फक्त समर्थनापंर्यत उपयोग करून घेतला. रिपब्लिकन मतदानाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा राज्यातील काही मतदार संघात निवडणुकीत उतरणार असल्याचेही बागडेंनी सांगीतले.

नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, रावेर, औरंगाबाद, बीड, पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, शिरूर, कल्याण, दक्षिण मुंबई या मतदारसंघात उमेदवार लढवणार आहेत. नाशिक येथून काळाराम मंदिर सत्याग्रह स्मरण दिनानिमित्त रिपब्लिकन मतदान अस्तित्व मार्च प्रारंभ करण्यात येणार आहे. सदर मार्च संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून रिपब्लिकन मतदानाचे अस्तित्व समाजाला पटवून देण्यासाठी कार्यकर्त्यते पायपीट करणार आहेत, अशी माहिती नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रपरिषदेत देवेंद्र बागडे, प्रा.रमेश दुपारे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, दादाराव पाटील, के.टी.कांबळे, राजू पांजरे, वैशाली तभाने, संगिता चंद्रीकापुरे, चरणदास गायकवाड, सुनिता चांदेकर, संगिता वासनिक, रामभाऊ वाहणे, भाऊराव बोरकर, अँड मिलिंद खोब्रागडे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा