अमेरिका चीन व्यापार करारामुळे सोन्याच्या दरावर प्रभाव

नवी दिल्ली: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करारावरील स्पष्टतेमुळे बुधवारी सोने-चांदीला बहर आला. दुपारी १२ च्या सुमारास सोन्याचे वायदे (फेब्रुवारी) १९८ रुपये किवा ०.५० टक्क्यांनी वधारून प्रति १० ग्रॅम ३९,६४५ रुपये होते, तर चांदीचा वायदा २५७ रुपये किंवा ०.५६ टक्क्यांनी वाढून, ४६,२५६ रुपये प्रतिकिलो राहिला.

अमेरिकेचे अर्थमंत्री (ट्रेझरी सेक्रेटरी) म्हणाले की, चीनमधून आयात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क अजूनही लागू असेल. अमेरिकेच्या वित्त आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “भविष्यात शुल्क कमी करण्याचा कोणताही करार झालेला नाही. याबद्दल अफवा चुकीच्या आहेत.”

आजच्या व्यापारात सोन्याचा प्रतिरोध ३९,६०० रुपयांवर असल्याचे ब्रोकरेज फर्म एसएमसी ग्लोबलने सांगितले. सर्वात कमी ते ३९,१०० रुपयांपर्यंत पोचू शकते. त्याचप्रमाणे चांदीचा प्रतिरोध ४६.२०० रुपयांवर आहे. सर्वात कमी ते ४५,६०० रुपयांची पातळी दर्शवू शकते.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव ०.३० टक्क्यांनी वधारून १५३१.३८ डॉलर प्रति औंस झाला. मंगळवारी ३ जानेवारीला सोने १५३५.६३ डॉलर प्रति औंसच्या खाली आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा