अमेरिकन कंपनीची लस अंतिम टप्प्यात, इस्रायल खरेदी करण्यास तयार!

इस्रायल, दि. १६ जून २०२० : इस्रायल आपल्या देशातील लोकांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी अमेरिकन औषधनिर्माण संस्था मॉडर्नाकडून लस घेण्याची तयारी करत आहे. इस्त्रायली सरकार कंपनीशी अंतिम चर्चा करीत आहे. इस्त्रायली मीडिया संस्था वायएनईटी ने ही माहिती दिली.

इस्त्रायली आरोग्य मंत्रालयाने याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे, परंतु वायएनईटी नेटवर्कने ही बातमी प्रख्यात केली आहे. दुसरीकडे, मॉडर्नाने पुष्टी केली आहे की ३० जुलै रोजी ३० हजार लोकांवर त्याच्या नवीन लसीची क्लिनिकल ट्रायल घेतील.

अमेरिकेच्या मेसाच्युसेट्स मध्ये असलेली मॉडर्ना थेरपीटिक्स ही बायोटेक्नॉलॉजी कंपनी एक लस विकसित करत आहे ज्यामुळे मानवी इम्यूनिटी म्हणजेच रोग प्रतीकर शक्ती वाढवली जाईल. ज्यामुळे कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती वाढेल.

ही लस शरीरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करते. यासाठी, मोडर्नाने मानवी शरीरात कमकुवत आणि जवळजवळ निष्क्रिय व्हायरस ठेवण्याची तयारी केली आहे, जेणेकरून शरीर त्याच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करेल.

मोडर्नाने यासाठी कोरोना व्हायरस वापरलेला नाही. यासाठी वैज्ञानिकांनी कोरोनाचा जेनेटिक कोड तयार केला आहे. त्यातील एक छोटासा भाग इंजेक्शन ने शरीरात सोडला जाईल. ज्यानंतर ही लस कोरोना विषाणूशी लढेल.

जगभरात कोरोना विषाणू कोविड -१९ च्या लसीसाठी शास्त्रज्ञांचे सुमारे ९० संघ कार्यरत आहेत. सर्व वेगवेगळ्या पातळीवर पोहोचले आहेत. पण त्यांच्यापैकी फक्त ६ जण आहेत जे अंतिम टप्प्या जवळ आहेत. ज्याला मानवी चाचणी म्हणतात. त्यातील एक मॉडर्नची लस देखील आहे.

संपूर्ण जग कोरोनाशी झगडत आहे. जीवन अस्थव्यास्त झाले आहे. विषाणू नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. लस बद्दल, औषधे आणि प्रतिकारशक्ती बद्दल. परंतू अद्यापपर्यंत ही लस कधी तयार होईल हे कुणाला सांगता आले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा