अमेरिकेत धुक्यामुळे ६० वाहने एकमेकांना धडकली

अमेरिका (वृत्तसंस्था): अमेरिकेतील रिचमंड भागातील व्हर्जिनिया राज्यात धुक्यामुळे जवळपास ६० हून अधिक वाहने एकमेकांना धडकली. यात सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही.कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातात ५० जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विल्सम्सबर्ग शहरातील महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. हिमवृष्टीचे वातावरण व धुक्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाल्याने जवळपास ६० हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या. सर्व गाड्यांचा वेग कमी असल्याने जीवितहानी झाली नाही.
या विचित्र अपघातामुळे या महामार्गावर अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक जखमींना बाहेर काढले.
जखमी झालेल्या ५० हून अधिक जणांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा