अमेरिकी राजकारणातल दिलखुलास व्यक्तिमत्व बराक ओबामा

जातीय विषमतेची सर्व बंधने तोडून बराक ओबामा ४ नोव्हेंबर २००७ रोजी बराक ओबामा अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच २० जानेवारी २००९ ला पदग्रहण केले होते. ते आता राजकारणात सक्रिय नाहीत, परंतु त्यांनी केलेल्या कामाची अजूनही चर्चा केली जाते. बघू या राजकारणात सक्रिय नसूनही ते आता काय करताहेत ते?

बराक ओबामांचा यांचा जन्म ४ ऑगस्ट १९६१ रोजी होनुलुलुतल्या हवाईमध्ये झाला. त्यांनी बिझनेस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन कंपनीत नोकरी केली. पण तिथे ते फार काळ रमले नाहीत.
अमेरिकेतल्या वेगवेगळ्या चर्चसोबत कम्युनिटी डेव्हलपमेंटचे काम ते करू लागले. त्यानंतर त्यांना त्यांची दोन ध्येय मिळाली. एक म्हणजे बायको मिशेल रॉबिन्सन आणि दुसरे म्हणजे राजकारणात एंट्री.

१० फेब्रुवारी २००७ ला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुक लढवण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केली. आणि त्यानंतर इतिहासच घडला. ओबामा २००८ ते २०१७ पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

एवढे मोठे पद सोडल्यावर साहजिकच आयुष्यात एक पोकळी निर्माण होत असते. पण ती निर्माण होऊ न देता आयुष्यात बरेच काही करण्यासारखे आहे, आणि ओबामा त्यांचे आयुष्य पुरेपूर सार्थकी लावत आहेत.राष्ट्राध्यक्षाचे पद सोडल्यापासून ते आता जरा निवांत वेळ स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला देतात. कुटुंबाबरोबर काही सहलींचा आनंद घेतात. मुलींच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष देतात.

८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राहून गेलेला वेळ पत्नी मिशेल यांना आवर्जून देतात. मित्रमैत्रिणींमध्ये कुटुंबासहित ते रमतात. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष असूनही खूप साधी जीवनशैली त्यांनी जपली आहे. जगभरातल्या लहान मुलांना शक्य असेल तिथे जाऊन भेटणे, विचारपूस करणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच सुशिक्षितांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याबाबत ओबामा कार्यरत असतात. ते आपला छंद जोपासत गोल्फ खेळणे, ओप्रह विंफ्रे आणि टॉम हँक्स बरोबर यॉटवर सैर करणे, ऍडवेंचर स्पोर्ट्स इत्यादी करमणुकीच्या गोष्टी करत असतात. इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून मदतीसाठी प्रयत्न करणे, हे ओबामा आवडीने करतात.

पर्यावरणाला पुढच्या पिढ्यापर्यंत सुस्थितीत पोचवण्याकडे त्यांचा कल आहे. त्यासाठी ते अशा संस्थांसोबत त्यांना शक्य असेल ती कामे करतात. समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना ओबामा भेटी देतात.
निवृत्तीनंतर नुसते हातावर हात ठेवून पेन्शनची उधळण करण्यात आयुष्य न घालवता, अजूनही समाजासाठी काय काय करता येईल, यासाठीच ओबामा आपला अमूल्य वेळ आणि आयुष्य खर्च करताना दिसतात.
त्यांच्या सारख्या अशा सामाजिक भान जपणाऱ्या राजनैतिक नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या बद्दल अजूनही खूप जणांना वाटतो तो आदर आणि हीच त्यांच्या आयुष्याची सच्ची कमाई.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा