चंडीगढ , २८ ऑक्टोबर २०२२; हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणातील सूरजकुंड येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या चिंतन शिविरात केलेल्या प्रदीर्घ भाषणाबद्दल जाहीरपणे फटकारले. साडेआठ मिनिटांच्या भाषणादरम्यान शाह यांनी त्यांना चारवेळा अडवले आणि त्यांना फक्त पाच मिनिटं देण्यात आल्याची आठवण करून दिली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
#Haryana के गृह मंत्री #AnilVij देश के गृह मंत्री #AmitShah के साथ चल रही बैठक में दे रहे थे लंबा-चौड़ा भाषण। इस बीच शाह ने उनके भाषण को बीच में रोकते हुए कह दी ये बात। पूरा मामला जानने के लिए देखें वीडियो। pic.twitter.com/yxv9MjHJgg
— I.khan S.P.(प्रदेश सचिव अल्पसंख्यक सभा) (@islamkhan919) October 28, 2022
नेमके काय घडले?
आयोजित कार्यक्रमात अनिल वीज यांनी फक्त अमित शाह यांचे स्वागत करणे अपेक्षित होते. पण त्यांनी अचानक हरियाणाचा इतिहास, हरित क्रांतीमधील राज्याचे योगदान, ऑलिम्पिकमधील कामगिरी, खेळासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा यासंबंधी सांगण्यास सुरुवात केली. वीज यांचे भाषण लांबत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चिठ्ठी पाठवली आणि भाषण संपवा असे सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी माईकवर हात मारत अप्रत्यक्षपणे सूचना देखील केली. पण यानंतरही ते थांबले नाहीत. यानंतर मात्र अमित शाह यांनी माईक हातात घेतला आणि अनिल वीज यांना भाषण थांबवा सांगितले.
आता फार झाले; भाषण थांबवा
विज यांचे भाषण लांबल्याने अमित शाह अस्वस्थ झाले. आणि अमित शाह म्हणाले, तुम्हाला पाच मिनिटे दिली होती. तुम्ही आधीच साडे आठ मिनिटे बोलला आहात. आता फार झाले. तुमचे भाषण थांबवा, मोठी भाषणं देण्याची ही जागा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक