अमित शहा यांनी बैठकीच्या माध्यमातून दिल्लीतील परिस्थितीचा घेतला आढावा

नवी दिल्ली, दि. १८ जून २०२०: दिल्लीतील कोविड -१९ परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी आणि सोमवारी म्हणजे १५ आणि १६ जून रोजी बैठकांच्या शृंखलेत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने त्वरित नमुना चाचणी संख्या दुप्पट करण्यात आली. १५-१६ जून रोजी एकूण १६,६१८ चाचणी नमुने घेण्यात आले. त्याआधी १४ जून पर्यंत दररोज ४००० ते ४,५०० नमुने गोळा केले जायचे. आतापर्यंत ६,५१० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत आणि उर्वरित अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील.

कोविड व्यवस्थापन बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या २४२ प्रतिबंधात्मक क्षेत्रात घरोघरी जाऊन रहिवाशांचे आरोग्य सर्वेक्षण केले गेले. या क्षेत्रातील एकूण २,३०,४६६ लोकसंख्येपैकी १५-१६ जून दरम्यान १,७७,६९२ व्यक्तींचे संपूर्ण सर्वेक्षण केले गेले आहे. उर्वरित व्यक्तींचे सर्वेक्षण २० जूनपर्यंत केले जाईल.

दिल्लीतील कोविड परिस्थितीशी सामना करण्यासाठी अमित शहा यांनी दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण करण्यात येणाऱ्या कारवाईचा एक भाग म्हणून प्रयोगशाळांद्वारे आकारण्यात येणाऱ्या दरांबाबतचा डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचा अहवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला प्राप्त झाला आहे आणि पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी तो दिल्ली सरकारकडे पाठविण्यात आला आहे. समितीने प्रत्येक चाचणीचा दर २,४०० रुपये निश्चित केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आणखी एक कारवाई करण्यात आली ती म्हणजे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरने मंजूर केलेल्या नवीन नियमावलीनुसार १८ जूनपासून कोविड-१९ ची चाचणी नवीन जलद अँटीजेन पद्धतीनुसार केली जाईल. हे तंत्र बरेच वेगवान आणि किफायतशीर असेल. किटच्या पुरवठ्यास दिल्लीला प्राधान्य दिले जाईल आणि नमुने संकलन तसेच चाचणीसाठी दिल्लीत एकूण १६९ केंद्रे सुरू केली गेली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा