हिंसेमध्ये जखमी झालेल्या दिल्लीच्या पोलिस कर्मचाऱ्यांची अमित शहांनी घेतली भेट

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२१: प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्च्यातल्या हिंसेमध्ये जखमी झालेल्या दिल्लीच्या पोलिस कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राजधानीतल्या सुश्रुत ट्रॉमा केंद्रामध्ये आणि तीर्थराम रूग्णालयात जावून भेट घेतली आणि जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

एका ट्विटमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, ‘‘ आज दिल्लीच्या बहादूर पोलिस कर्मचाऱ्यांची रूग्णालयामध्ये भेट घेतली आणि त्यांना लवकर बरे वाटावे, अशी कामना केली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारामध्ये त्यांनी दाखवलेला पराक्रम आणि संयम म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. त्याबद्दल संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो.’’

गृहमंत्री अमित शहा यांनी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची घेतली भेट

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मेळाव्याच्यावेळी ऐतिहासिक लाल किल्ल्यासह दिल्लीतल्या अनेक स्थानावरून काढण्यात आलेल्या मोर्च्यांमध्ये सहभागी झालेल्या लोकांद्वारे हल्ले करण्यात आले आणि तोडफोडही करून पोलिस दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दिल्ली पोलिस दलातले अनेक अधिकारी आणि जवान जखमी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा