नवी दिल्ली, दि. २० जून २०२०: भारत आणि चीनमधील तणावामुळे सर्वपक्षीय बैठकीनंतरही कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सरकारवर हल्ले करत आहेत. राहुल गांधींनी वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी गलवान खोऱ्यात चकमकीत जखमी झालेल्या सैनिकाच्या वडिलांचा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. शहा यांनी व्हिडीओ रीट्वीट करत म्हटले आहे की, राहुल गांधींना शूर सैनिकाच्या वडिलांचा संदेश स्पष्ट आहे.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अशा वेळी जेव्हा संपूर्ण देश एकसंध असेल राहुल गांधींनीही क्षुल्लक राजकारणातून बाहेर पडून देशाशी एकसंघ व्हायला हवे. राहुल गांधींनी राष्ट्रासाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अमित शहा यांनी जखमी सैनिकाच्या वडिलांचा व्हिडिओ रीट्वीट केला, ज्यात शूर सैनिकाचे वडील भारतीय सेना एक मजबूत सैन्य असल्याचे सांगत आहेत.
जखमी सैनिकाच्या वडिलांनी असे म्हटले आहे की भारतीय सैन्य चीन सारख्या कोणत्याही देशाच्या सैन्याला हरवू शकते. मी यावर राहुल गांधींना राजकारण करू नका असे सांगेन. माझा मुलगा सैन्यामध्ये लढताना जखमी झाला आहे व तो बरा झाल्यावर तो पुन्हा सीमेवरती सज्ज राहणार आहे. सीमेवरती झालेल्या हिंसक चकमकीत २० जवान शहीद झाले होते त्यानंतर काँग्रेसने भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावरून वारंवार सरकारवर टीका करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी