कृषि पथकाच्या धाडीवरून अब्दूल सत्तार यांच्यावर अमोल मिटकरी यांचे गंभीर आरोप, पैसे उकळल्याचा केला दावा

अकोला, १० जून २०२३ : आठ दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरामध्ये शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी अधीक्षकांनी कारवाई कारवाई करत, कृषी केंद्राचा परवाना निलंबित केला. त्याचबरोबर कृषी केंद्र आणि तीन गोडाऊन मधील तब्बल दीड कोटी रुपये किमतीचे बियाणे गोडाऊनमध्ये सील केले आहे. तर अकोला येथे आता नवीनच घटना समोर आली आहे.

अकोला येथे कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकाने एमआयडीसीमध्ये धाडी टाकल्या आहेत. मात्र या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. तर याच पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांचे स्विय सहायक दिपक गवळी यांचाही समावेश आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून अब्दूल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अमोल मिटकरी यांनी या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच हाच आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाने देखील केला आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर मिटकरी यांनी याप्रकरणी आपण राज्यपल यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे पाप कृषी मंत्री अब्दुल सत्तार करत असल्याची घणाघाती टीका मिटकरी यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा