कृषी विभागाच्या उपक्रमात अमरावती विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर

अमरावती,दि.१,जून २०२०: कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “शेतकऱ्यांना बांधावर निविष्ठा पुरवठा” या योजनेचा आतापर्यंत विभागातील १९४८ गटातील २९ हजार ८३८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

तसेच ७५१५.५६ टन खत व ८५१९.१८  क्विंटल बियाणांचा शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्यात आला आहे. अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.

कृषी विभागाने ही योजना यशस्वीपणे राबवली असून अमरावती विभाग राज्यात प्रथम स्थानावर आला आहे .या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील इतर सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा व घरपोच कृषी निविष्ठा मिळवून कोरोना विषाणूची संक्रमण साखळी सोडण्याकरता शासनाची व वन विभागाची मदत करावी.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती विभागीय कृषि सह संचालक सुभाष नागरे यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा