अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिकेतील विविध विषयांचा घेतला आढावा

अमरावती २५ नोव्हेंबर २०२३ : उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री महाराष्‍ट्र राज्‍य तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज महानगरपालिका कार्यालय येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन योग्यरित्याने होण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराकडून घनकचरा व्यवस्थापन नियमितपणे करुन घ्यावे. यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. ही कामे नियमितपणे होत आहे, याबाबत खातरजमा करावी.

या बैठकीत खासदार अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, जिल्‍हाधिकारी सौरभ कटियार, महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार, उपायुक्‍त जुम्‍मा प्‍यारेवाले, माजी नगरसेवक तसेच नगरसेविका, मनपा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : मनिष जगताप

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा