अमरावती जिल्ह्यात संचारबंदी कायम: जिल्हाधिकारी

अमरावती, दि.२ जून २०२० : अमरावती जिल्ह्यात संचारबंदी कायम असेल तर राज्य शासनाच्या आदेशानुसार, अर्थ चक्राला गती देण्यासाठी विविध उद्योग व्यवसायांना टप्प्याटप्प्याने परवानग्या देण्यात येणार आहे. येत्या तीन जूनला म्हणजेच उद्या “मिशन बिगेन अगेन” चा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

लॉकडाऊन जसा टप्प्याटप्प्याने लावला तसाच तो आता एकदम उठवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत आपण लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असला तरी ३ जून ५ जून आणि ८ जूनपासून वेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होत आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व आवश्यक सेवा दुकाने यांना टप्प्या टप्प्यात परवानगी देण्यात येणार आहे. तरी याबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा