मुंबई, ९ मार्च २०२१: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी ८ मार्च ला एक गाणं काढणार असं म्हटलं होतं आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी गाणं गायलं ही पण त्या गाण्याला ट्रोलर्सने डोक्यावर घेतले आहे आणि “पुन्हा एकदा मामी भसाड्या आवाजात आल्या” म्हणत अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात सुरवात केली.
ट्रोलर्सने फक्त अमृता फडणवीस यांनाच ट्रोल नाही केले. तर त्यांनी गाणं प्रदर्शित केलेल्या टी-सिरीज, देवेंद्र फडणवीस आणि गाण्यात काम केलेल्या कलाकारांवरही ताशेरे ओढले आहेत.
टी – सिरीज ने हे गाणं प्रदर्शित केलं आहे. ज्याचे नाव “कुणी म्हणाले” आहे. पण ट्रोलर्सने टी सिरीज ला धारेवर धरल्याचे दिसत आहे. परीणामी टी सिरीजवाल्यांनी लाईक डिसलाईकचे ऑप्शन बंद करून ठेवले आहे. या आधीच्या प्रदर्शित केलेल्या टी सिरीजने अमृता फडणवीसच्या गाण्याला लाईक पेक्षा डिसलाईकचे प्रमाण चौपट-पाचपटीने जास्त होते.
तर पाहूयात सोशल मिडीयावरील ट्रोलर्सने अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर दिलेल्या प्रतिक्रिया…..

















































