अमूल दुधाच्या दरात वाढ, 2 रुपये प्रतिलिटर महागणार

Amul milk price hike, 2 मार्च 2022: अमूलने देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंगळवार, 1 मार्चपासून अहमदाबाद आणि सौराष्ट्र (गुजरात) बाजारपेठेत अमूल गोल्ड दुधाची किंमत 30 रुपये प्रति 500 ​​मिली असेल. तसेच, अमूल ताजाच्या प्रत्येक 500 मिली दुधासाठी 24 रुपये आणि अमूल शक्ती दुधाच्या 500 मिलीसाठी 27 रुपये मोजावे लागतील.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते. ही दरवाढ सोना, ताझा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या अंतरानंतर दरात वाढ करण्यात येत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अमूलने देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंगळवार, 1 मार्चपासून अहमदाबाद आणि सौराष्ट्र (गुजरात) बाजारपेठेत अमूल गोल्ड दुधाची किंमत 30 रुपये प्रति 500 ​​मिली असेल. तसेच, अमूल ताजाच्या प्रत्येक 500 मिली दुधासाठी 24 रुपये आणि अमूल शक्ती दुधाच्या 500 मिलीसाठी 27 रुपये मोजावे लागतील.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते. ही दरवाढ सोना, ताझा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या अंतरानंतर दरात वाढ करण्यात येत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा