कोरोना संदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आज होणार सर्वपक्षीय बैठक

12

नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी देशातील कोविड -१९ च्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. नजीकच्या भविष्यकाळात कोरोना लसीच्या वितरण योजनेवरही सरकार यावेळी चर्चा करण्याची शक्यता आहे.

साथीच्या आजारामुळं सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली असून त्यात अनेक पक्षांचे नेते सहभागी होतील. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रकरणात होणारी वाढती वाढ लक्षात घेता अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आभासी बैठक घेतली.

ही सर्वपक्षीय बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा गेल्या ७ दिवसांपासून दिल्ली सीमेवर सरकारनं तयार केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलन करीत आहेत. तथापि, कोरोना लसीच्या योजनेवर बैठकीत चर्चा होणार आहे.

दरम्यान, गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३,७२४ नवीन रुग्ण आढळले तर गेल्या २४ तासांत ८२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळं मृतांची संख्या ९४४२ वर पोचली आहे. दिल्लीत सक्रीय रूग्णांची संख्या गुरुवारी ३०,३०२ वरून २९,१२० वर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे