एक अटल पर्व……. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त

आज संपूर्ण देशात ख्रिसमस सण साजरा होत असला तरी अजून एक विशेष आणि खास दिवस आहे. तो म्हणजे देशाचे पंतप्रधान, कणखर आणि निडर,भारदस्त, हिंदी कवी व्यक्तिमत्व अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस. २५ डिसेंबर १९२४ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म झाला.

शिक्षण….

अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते.

राजकीय प्रवास……

राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा आणि आदर मिळवला.त्यांची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात होती. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

भारतीय जनसंघ

भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय कॉंग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला कॉंग्रेस (आय) पक्ष सत्तेवर आला. तद नंतर १९७५ साली इंदिरा गांधी यानी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यांनी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले.

वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९ मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प झाला होता. वाजपेयी यांनी निःशस्त्रीकरण परिषदे मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला आणि १९८० साली भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना केली. पुढे अनेक वेळा ते देशाचे पंतप्रधान झाले.

अटल शासन काळातच भारताने पोखरण येथे परमाणु चाचणी केली.तसेच कारगिल युद्धही झाले होते. ज्यामधे भारताने पाकिस्तानाला सळो की पळो करून सोडले होते.१९९६ साली त्यांनी पंतप्रधान पदी पहिल्यांदा शपथ घेतली. दुसर्यांदा १९९८ साली पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या एकाच कार्यकाळात विरोधी सरकार ला दोन वेळा सरकार बनवण्याची संधी मिळाली. तर तिसर्यांदा १९९९ ते २००४ पर्यंत ते पंतप्रधान राहीले. त्यांच्या कार्यकाळात भारतीय विमानाचे अपहरण झाले होते. जे काठमांडू पासून दिल्लीला निघाले होते. तेव्हा अटल सरकार ने तीन अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवाशांना सोडवलं होतं तर २००१ साली संसदेवर अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता ज्या मधे ७ भारतीय सुरक्षक मारले गेले होते. पण, पोलिसांनी वेळीच त्यांचा खात्मा केला म्हणून एक मोठा अनर्थ टळला.

निधन…..

दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. त्यांनी ५:०५ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता ‘एम्स’च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ जाहीर करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा