उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.१ इतकी तीव्रता

4

डेहराडून, ११ मे २०२३: उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.१ इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पिथौरागढपासून ३२ किमी उत्तरेस होता. त्याचा प्रभाव सुमारे पाच किमीपर्यंतच्या परिसरात दिसून आला.

सकाळी ६.१५ वाजता जामीन अचानक हादरायला लागली तेव्हा लोकांना याची माहिती मिळाली. त्यामुळे अलीकडे दरड कोसळण्याच्या आणि घरांना तडे जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत लोक आधीच घाबरले, नंतर त्यांना वास्तव कळले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा भूकंप पिथौरागढपासून ३२ किमी उत्तरेस होता आणि त्याची खोली सुमारे पाच किमी इतकी होती. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कुटलीही नुकसान झाली नाही.

दरम्यान, संपूर्ण उत्तराखंड आणि त्यातही उत्तरकाशी व पिथौरागढ हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जातात. अलीकडेच पिथौरागढमध्येच ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. या वर्षातच तीनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. २२ मार्च रोजी येथे ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा