जेजुरीत वृद्ध महिलेला रेल्वेने चिरडले.

जेजुरी (पुरंदर), दि. २० जून २०२०: रेशनिंग घेऊन घरी परतत असताना रेल्वे ने चिरडल्याची घटना जेजुरी रेल्वे स्थानकात मध्ये घडली आहे. रेल्वेचा पादचारी पुल वर्षभरापासून बंद असल्याने वृद्धेचा नाहक बळी गेल्याने रेल्वे रहिवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

लीलावती नानासो पाटील (वय ७०) रा. जेजुरी रेल्वे स्टेशन. रेल्वे रूळ ओलांडून जात असताना अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आहेत. जेजुरीच्या रेशनिंग दुकानातून परत घरी जाताना रेल्वे रूळ ओलांडत असताना भरधाव रेल्वे ने चिरडले. त्यांच्या शरिराचे छन्नविछीन्न तुकडे झाले. गेल्या वर्षी जेजुरी रेल्वेस्टेशनमधील रेल्वे पादचारी पूलाचे नुकसान झाले होते. त्यांच्या दुरुस्ततीचे काम होत असल्याने रेल्वे कडून तो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या लोकवस्तीकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जिव धोक्यात घालत रेल्वे रुळावरून जावं लागत आहे. त्यामुळे आज या ७० वर्षीय महिलेला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दिल्ली हुन जाणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेस ने या महिलेला रुळावर जोरदार धडक दिली. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

या रेल्वेस्टेशनवर जेजुरीत येणारे भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या पुलाचे काम लवकर होणे गरचेचे होते. लोकप्रतीनीधींच्या हट्टापाई दर्शनी भागावर मोठ्या प्रमाणावर खर्च करून गडाची प्रकृती केली. मात्र लोकांच्या सुरक्षिततेला तिलांजली वाहिल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन असलेल्याने लोकांची वर्दळ सध्या कमी आहे. रेल्वे मंत्रालय फक्त सुशोभीकरणासाठी मोठा खर्च करत आहेत, पण रहिवासी व प्रवाशांच्या सुरक्षेला फाटा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जेजुरीत भाविकांची येण्याची संख्या मोठी असते जीव धोक्यात घालत लोक स्थानकात येतात. हा रेल्वे पादचारी पूल लवकर दुरुस्त व्हावा अशी मागणी खा. सुप्रिय सुळे यांना करणार असल्याचे प्रवासी संघटना व रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा