लष्करातील मेजरसह एक अभियंत्याला लाचखोरी प्रकरणी अटक

नाशिक,१५ ऑक्टोबर २०२२: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे‌. ठेकेदाराकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सीबीआय-एसीबीच्या अटकेत असलेल्या लष्करातील मेजरसह कनिष्ठ अधियंत्याला जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सूनावली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगरच्या कॅट्स आवारात सीबीआयच्या नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे निरिक्षक रणजित पांडे, गजानन देशमुख यांच्या पथकांने मिलिटरी इंजिनिअरिंग मेजर तथा सहायक लष्करी अभियंता हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एक लाख वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची लष्कराने गंभीर दखल घेतली. सैन्य अतिशय शिस्तबद्ध विभाग आहे. लष्कर सीबीआयला तपासात सपुर्ण सहकार्य करणार असल्याचे पुणे येथील सैन्यदलाचे जनसंपर्क प्रमुख महेश अय्यंगार यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा