शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण, आज होणार महत्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली, २६ डिसेंबर २०२०: नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी धरणेवर बसलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आज एक महिना पूर्ण झाला आहे. २६ नोव्हेंबरला एक महिन्यापूर्वी शेतकरी सिंघु सीमेवर जमले होते. या एक महिन्याच्या कालावधीत दिल्लीमध्ये थंडी यावर्षीच्या सर्वात खालच्या पातळीवर गेली होती. दिल्लीतील पारा ४ अंशाच्या खाली गेला होता. अशा गोठवणाऱ्या थंडीत गेल्या एक महिन्यापासून शेतकरी दिल्लीत रस्त्यावर ठाण मांडून बसले आहे. याकाळात वीसहून अधिक शेतकरी थंडीमुळे मरण पावले. अशा स्थितीत आजही त्यांचे आंदोलन सुरूच आहे.

सरकारने प्रारीत केलेले नवीन कृषी कायदे मागे घ्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सरकार आणि शेतकरी यांच्यात आत्तापर्यंत चर्चेच्या सहा फेऱ्या झाले आहेत. मात्र, यातून कोणताही तोडगा निघाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शेतकऱ्यांना संबोधित करत नवीन कृषि कायदे त्यांच्या हिताचे कसे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

नवीन वर्षापासून अपेक्षा

वर्ष २०२० संपण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. सरकारपासून ते शेतकर्‍यांपर्यंत प्रत्येकजण ही आशा व्यक्त करीत आहे की, शेतकर्‍यांच्या या मागण्यांसाठी एक सर्वमान्य तोडगा निघाला पाहिजे. या संदर्भात शनिवारी शेतकरी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेसाठी घेतलेल्या नव्या प्रस्तावावर चर्चा करतील आणि त्यापुढील रणनीती यावर चर्चा करतील.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, काही शेतकरी संघटनांनी असे संकेत दिले आहेत की, ते पुन्हा एकदा सरकारशी चर्चा सुरू करू शकतील, जेणेकरून या गोंधळावर काही तोडगा निघू शकेल. शेतकरी संघटनांनी सांगितले आहे की, आज शनिवारी ते केंद्र सरकारची बैठक घेतील आणि यामध्ये सरकारने काय निर्णय घेतला आहे याविषयी मंथन करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा