लखीमपूरसारखी घटना यापूर्वी कधीही घडली नाही, योगींनी राजीनामा द्यावा- शरद पवार

मुंबई, 14 ऑक्टोंबर 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर खेरी घटनेवर भाजपच्या केंद्र आणि यूपी सरकारला घेरलं आहे.  ते म्हणाले की, लखीमपूरसारखी घटना आजपर्यंत घडलेली नाही.  यासोबतच पवार यांनी लखीमपूर घटनेचा संदर्भ देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, लखीमपूरसारखी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.  आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, गृहराज्यमंत्री (अजय मिश्रा) (आशिष मिश्रा) यांचा मुलगाही तेथे उपस्थित होता.  जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं यावर सुनावणी केली, तेव्हा मंत्र्याचा मुलगा पकडला गेला.
पवार पुढं म्हणाले, ‘सत्तेत असणाऱ्यांनी यावर भूमिका घेण्याची गरज आहे.  मुख्यमंत्री योगी अशा प्रकारे आपल्या जबाबदारीपासून दूर जाऊ शकत नाहीत.  त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
 दुसरीकडं, पवारांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आणि म्हणाले, ‘फणणवीस यांनी लखीमपूर घटनेची तुलना मावळातील गोळीबाराशी केली.  पोलिसांनी मावळात गोळ्या झाडल्या होत्या, कोणत्याही नेत्यावर कोणतेही आरोप नव्हते.  भाजप नेत्यानं जमावाला भडकवलं.
पुंछ दहशतवादी हल्ल्यावर म्हणाले – सुरक्षेच्या मुद्द्यावर आपण सर्व एकत्र आहोत
 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुंछ दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं.  यामध्ये पाच जवान शहीद झाले.  पवार म्हणाले, पुंछमध्ये जे घडलं ते चिंताजनक आहे.  मी केंद्र सरकारशीही बोललो.  आपल्याला एकत्र येऊन कारवाई करावी लागंल.  गेल्या महिन्यात राजनाथ सिंह यांनी मला आणि एके अँटनी यांना बोलावलं.  आमचे राजकीय मतभेद असू शकतात पण देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत.  यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा