गिधाडांच्या संवर्धन मोहिमेसाठी, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी चा पुढाकार

16

मुंबई, १३ सप्टेंबर २०२२: देशात आणि महाराष्ट्रात, लाल डोक्याचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाड आणि लांब व बारीक चोचीचे गिधाड, अशा चार प्रजातीच्या गिधाडांची संख्या मोठया प्रमाणावर घटली आहे. मृतदेहांचे मांस हे गिधाडांचे प्रमुख खाद्य असल्याने तो निसर्गातील सफाई कर्मचारी असून अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा असणारा हा पक्षी आहे.अतिसंकटग्रस्त प्रजातीमध्ये या पक्षाचा समावेश आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ने केंद्र सरकारच्या वन-पर्यावरण मंत्रालय तसेच मध्य प्रदेश व आसाम सरकारांच्या संयुक्त विद्यमानाने गिधाड संशोधन व संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे.

गिधाड हा उंच झाडावर, डोंगर कड्यावर झाडाच्या काटक्यांनी घरटी बनवतात व एका वेळी एक अंडे घालून पिल्लू जन्माला घालतात. गुरांना दिलेल्या डायक्लोफेनेक या जनावरांना दिलेल्या या औषधांमुळे गिधाडांच्या आरोग्यासोबत त्यांच्या प्रजननावरही नकारात्मक परिणाम झाले होते. डायक्लोफॅनक वरील बंदी नंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नसल्याने आता शास्त्रीय दृष्ट्या योग्य पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे असे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी चे म्हणणे आहे.

कोकण, पश्चिम घाट, मेळघाट आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भाग वगळता राज्यात गिधाड पक्षी आढळत नाही. त्यामुळे गिधाड पक्षाविषयी जनजागृती व्हावी या निमित्ताने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने ‘गरज गिधाड संवर्धनाची’ हे मराठी पोस्टर प्रकाशित केले. तसेच गिधाडांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित ठिकाण म्हणून घोषित करण्याची मागणी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये व पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा