मुंबई, २८ जून २०२० : कोरोना मुळे २४ मार्च पासून संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये गेला होता परंतू आत्ता काही अटीवर व्यवसायीक ठिकाणे, ऑफिसेस , कंपन्यांना सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
परंतू मॉल्स, चित्रपट गृह , शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थान अजून बंद आहेत. परंतू मुलांचे नुकसान होवू नये म्हणून अनेक खाजगी शाळांनी मुलांसाठी ऑनलाइन क्लासेस सुरू केले.
परंतू सरकारी शाळा व इतर खाजगी शांळांमध्ये शिकणा-या गरीब वस्तीत राहणा-या मुलांना त्यांच्या परिस्थितीमुळे ऑनलाइन आभ्यास करणे आवघड आहे, आणि याच बाबीचे गांभीर्य ओळखून मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी आज मुलांच्या आवडीची कार्टून पात्रांचा पेहराव करून मुलांमध्ये खाद्य पदार्थ व पुस्तके वाटली.
या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक कुर्मी म्हणतात की, “कोविड १९ मुळे त्यांच्या शाळा बंद पडल्या आहेत आणि ते पुन्हा कधी उघडतील हे आम्हाला ठाऊक नाही. म्हणून आम्ही त्यांना खाद्य पदार्थ व पुस्तकांचे वाटप केले जेणे करून ते शिक्षणा पासून लांब जावून त्यांचे नुकसान होवू नये ”
न्यूज अनकट प्रतिनिधी