पुणे, दि.६ मे २०२०: सध्या देशात लॉकडाऊन असल्याने सर्व उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना खायला दोन वेळचे अन्न मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुण्यातील अनाम्रित फाउंडेशनने याची दखल घेऊन पुण्यातील ५० वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे ६० हजार गरजू लोकांना दोन वेळच्या अन्नाचा पुरवठा करत आहे. अशी माहिती अनाम्रित फाउंडेशनच्या जनसंपर्क प्रमुख भक्ती भोसले यांनी दिली.
अनाम्रित फाउंडेशन पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या संस्थेकडून पुण्यातील १२० शाळांमध्ये स्वास्थ पोषण आहार पुरविण्याचे काम करते. मात्र सध्या शाळा बंद असल्याने त्यांनी नागरिकांची गरज ओळखून एवढ्या लोकांच्या जेवणाचा प्रश्न सोडवत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र जेवणासाठी अन्न पुरवठा कमी पडत होता. मनुष्यबळ कमी पडत होते. या सर्वांसाठी लागणार खर्च मोठा होता. या आर्थिक खर्चाचा प्रस्ताव राहुल बजाज यांच्या समोर फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्यांनी सीएसआर फंडामधून फाउंडेशनला निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे फाऊंडेशनला मोठा आधार मिळाला.
दि.२५ मार्चपासून आतापर्यंत अनाम्रित फाउंडेशन सुमारे ६०हजार नागरिकांना जेवण देण्याचे काम करत आहे.
यासाठी लागणाऱ्या कामासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अशा संघातील विद्यार्थ्यांची मोठी मदत होत आहे. ही मदत करताना ५-५मुलांचा एक गट बनविण्यात आला आहे. हे मुले जेवणाच्या टेम्पोसोबत जाऊन सोशल डिस्टन्सचा वापर करत लोकांपर्यंत जाऊन त्यांना जेवण वाटप करत आहेत.
या कामात पिंपरी चिंचवड महापालिकेने ही या जेवण वाटप करणाऱ्या मुलांना मास्क ,सॅनिटायझर आणि हँडवॉशचे वाटप करण्यात आले.
या सर्व नागरिकांना लागणार भाजीपाला आणि अन्य वस्तू काही शेतकऱ्यांनी फाउंडेशनला मोफत नेण्यास सांगितल्या. परंतू
अनाम्रित फाउंडेशन त्या शेतकऱ्यांकडून नियमित भावात विकत घेतला व तो गरजू नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या पाळीव प्राण्यांसाठी या फाऊंडेशनकडूने ५०० किलो चारा विकत घेऊन तो त्या प्राण्यांपर्यंत पोहचवण्याचे काम अनाम्रित फाउंडेशन लॉकडाऊन संपेपर्यंत करणार आहे, अशी माहिती अनाम्रित फाउंडेशनच्या जनसंपर्क प्रमुख भक्ती भोसले यांनी “न्यूज अन कट” शी बोलताना दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रगती कराड