पुणे : आध्यात्मिक उन्नती व सामाजिक सेवा यांचा संगम असलेले आनंदमार्ग शिबिर आजपासून कात्रज येथील दुगड फार्म जैन मंदिरात सुरू होत आहे. फेब्रुवारी ७ ते ९ या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात ध्यान, योग, धारणा आणि किर्तन होणार असून, आचार्य संपूर्णानंद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिरात १००-१५० साधक सहभागी होणार असून, निःशुल्क भोजन व्यवस्था आणि ३ तासांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. “श्रेय आणि प्रेय” या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शनही दिले जाईल. आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे शिबिर नक्कीच गाठा !