गोल पोस्ट इतर शुभेच्छा आनंतराव थोपटे यांच्यावर वाढदिवसानिमित्त भोर मधून शुभेच्छांचा वर्षाव

आनंतराव थोपटे यांच्यावर वाढदिवसानिमित्त भोर मधून शुभेच्छांचा वर्षाव

भोर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचा आज (११ जानेवारी) वाढदिवस आहे. त्यामुळे भोर मतदार संघात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले आहे. अनंतराव थोपटे हे नेहमीच युवकांना प्रोत्साहित करत आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दिसत आहे. या निमित्ताने मधुकर कानडे व त्यांच्या सहायोग्यांनी थोपटे यांना आज शुभेच्छा दिल्या. अनंतराव थोपटे यांनी भोर मतदारसंघाचे सहा वेळा नेतृत्व केले आहे.

गेली चार दशके थोपटे पिता-पुत्रांची सत्ता येथे असल्यामुळे ‘भोर म्हणजे थोपटे व थोपटे म्हणजे भोर’ हे समिकरण झाले आहे. सर्व बाजूने घेरूनही १९९९ चा अपवाद वगळता ‘बारामतीकरांना’ थोपटेंचा ‘गड’ काबीज करण्यात यश आले नाही. अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे या वेळेस सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. २०१४ मध्ये बारामतीकरांना कात्रजचा घाट दाखवून, शिवसेनेला धोपीपछाड देत, तर भाजपला रोखणारे संग्राम थोपटे यांनी या वेळी ‘हॅट्रिक’ केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version