गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू

रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे येत असताना रेल्वेरूळ ओलांडणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. गौतमी महेंद्र जाधव, रवी चंदर पिलाव, अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मृत गौतमी जाधव आणि रवी पिलाव हे दोघेजण मालगाडी समोरून येत असतानाही रेल्वे रूळ ओलांडत होते. अखेर वेगाचा अंदाज न आल्याने व त्याना वेळेत रुळ ओलांडता न आल्याने भरधाव वेगातील मालगाडीची दोघांना धडक बसली.
रेल्वे रूळ ओलांडून मृत्यूला आमंत्रण देऊ नका, असे आवाहन रेल्वे पोलीस कर्मचारी सुनील लोंढे यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version