आणि कोरोनाने केला टेलिव्हिजन मालिकेच्या सेटस् वर शिरकाव…….!

29

मुंबई, ९ जुलै २०२० : कोरोनाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला असताना आता नागरिक ही दक्षता घेत कोरोना बरोबर जगायला शिकू लागले आहेत. महाराष्ट्र सध्या अनलाॅकच्या प्रोसेस मधून जात आसून अनेक क्षेत्रांना सरकारने शर्तींसह काही कार्यांसाठी परवानगी दिली आहे. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे मनोरंजन क्षेत्र.

मनोरंजन क्षेत्राला सरकारची परवानगी मिळताच मालिकेंच्या चित्रिकरणास शर्तीसह आणि दक्षतेबरोबर सुरवात झाली.परंतू आता कोरोनाने मालिकेंच्या सेटवर देखील शिरकाव केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हिंदी मालिका ‘मेरे साई’ च्या शूटिंग सेटवर कोरोना व्हायरसची पहिली केस समोर आली आहे. सेटवरील एका कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्या कर्मचाऱ्याने कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तर दुसरीकडे ‘डॉ. बी.आर. आंबेडकर एक महानायक’ या मालिकेतील मुख्य कलाकाराची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

“मेरे साई” या मालिकेतील सेटवरील सर्व कलाकारसह टेक्निशन्सना क्वारंटाईन केले असून त्यांची कोरोना टेस्ट करुन घेऊन ज्यांची नेगेटिव्ह चाचणी येईल त्यांच्या बरोबरच परत शुटींगला सुरवात होईल असे कळते. तर “डाॅ.बी.आर.आंबेडकर एक महानायक” च्या सेटवर बाबासाहेबांच्या वडीलांची भूमिका करणारे मुख्य कलाकार जग्गनाथ निवंगुणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे या मालिकेच्या सेटवरही हे कळाल्यानंतर सगळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मालिकेचे शूटींग गेले दोन दिवस बंद आहे.

सेटवर सर्व सुरक्षा आणि दक्षतेनंतर ही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे अनेक जण दहशती मध्ये आहेत तर सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.आणि मनोरंजन क्षेत्राला दिलेल्या सरकारच्या परवानगी नंतर असे प्रकार घडत असतील तर ती चिंतेची बाब आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी