चेन्नई, २२ जुलै २०२० : सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. सरकारने यावर अनेक सुरक्षिततेच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे मास्क वापरणे.
पण हल्ली बरेच जण हे नियम पाळत नाही आणि याचा त्यांना भुर्दंड ही बसला आहे. अनेकांना याचा दंड बसला असून यातून सरकारला सुध्दा अार्थिक फायदा झाला आहे.
पण बरेच जण असेही आहेत जे सरकारचा हा नियम पाळतात. या सामान्यांपासून ते सिलेब्रिटीपण आहेत. अशाच एका सेलिब्रिटीचा फोटो सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे तो म्हणजे,थलाईवा म्हणजेच सुपरस्टार रजनिकांत यांचा या फोटोमध्ये रजनीकांत हे मास्क लावून लैम्बॉर्गिनी चालावताना दिसत आहेत.
हा फोटो सोशल मिडियावर सध्या भलताच वायरल होत आहे.एका फैनने या फोटोवर ट्विट केले की, ” ते सेफ्टीसाठी स्वत:च आपली गाडी ड्राईव्ह करत आहेत. ” दुस-या एका फैनने लिहले की, ” ते साधेपणाने राहण्याचे ब्रँड अांबेसिडर हेत, ते सुपरस्टार आहेत.” रजनीकांत हे कायम असेच साधे राहतात याचेच सगळ्यांना कौतुक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी












































